ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडणार; मद्यविक्री, सलून मात्र बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 11:51 AM2020-05-04T11:51:49+5:302020-05-04T11:52:20+5:30
लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर केंद्राने अनेक सवलतींना परवानगी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या सवलती लागू केल्या आहेत. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडणार असल्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. यामुळे बºयापैकी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. मात्र जिल्ह्यातील कोणतीही मध्य विक्रीची दुकाने किंवा सलून दुकाने उघडणार नाहीत,
अहमदनगर : दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर केंद्राने अनेक सवलतींना परवानगी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या सवलती लागू केल्या आहेत. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडणार असल्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. यामुळे बºयापैकी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. मात्र जिल्ह्यातील कोणतीही मध्य विक्रीची दुकाने किंवा सलून दुकाने उघडणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्टपणे म्हटले आहे.
देशात गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्याच्या सूचना होत्या. परंतु हळूहळू यात सवलत देण्यात आली. दुसºया टप्प्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने अनेक सवलतींना परवानगी दिली. त्याबाबत सोमवारी मध्यरात्री जिल्हा प्रशासनाने आदेश काढून काही सवलतींना मुभा दिली. यात ग्रामीण भागातील सर्व म्हणजे इलेक्ट्रॉनिक, स्टेशनरी, इतर दुरुस्तीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील एकल वसाहतीतील दुकाने उघडण्यात परवानगी आहे. मात्र या ठिकाणी पाचपेक्षा जास्त दुकाने सलग असतील ती मात्र बंदच राहणार आहेत. रहिवासी वसाहतीमध्ये पाचपेक्षा कमी दुकाने असतील तर ती सुरू राहणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
डिझेल २४ तास खुले
डिझेल विक्रीच्या आधीच्या वेळेत बदल केला असून नवीन आदेशानुसार डिझेल २४ तास खुले राहील. पेट्रोलची वेळ मात्र पहाटे पाच ते सकाळी नऊ अशीच राहणार आहे. यात कोणताही बदल नाही.
मद्यविक्रीची दुकाने बंदच
प्रशासनाने ग्रामीण भागातील सर्व तसेच शहरी भागातील एकल वसाहतीतील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश काढले असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढील आदेश येईपर्यंत मद्य विक्रीची दुकाने खुली करू नयेत, असे स्पष्ट म्हटल्यामुळे मद्य विक्रीची कोणतीही दुकाने सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.