अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर; शाळा राहणार बंद
By साहेबराव नरसाळे | Published: March 12, 2023 05:11 PM2023-03-12T17:11:35+5:302023-03-12T17:12:58+5:30
राज्यामध्ये सर्व शासकिय निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.
अहमदनगर : जिल्हातिल सर्व प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने विविध मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. समन्वय समितीच्या बैठकीत या बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक रविवारी नगरमध्ये झाली. राज्यामध्ये सर्व शासकिय निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. संप कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय समितीने रविवारी घोषित केला. १४ मार्च रोजी १० वाजता नगरमधील आनंद विद्यालय येथून सर्व शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही प्रमुख मागणी या आंदोलनात असणार आहे.
१४ मार्चला आनंद विद्यालय या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याचे आव्हान अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने केलेले आहे.
या संघटना सहभागी -
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, आदर्श बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रेड पात्र मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अपंग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषद, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना आणि एकल शिक्षक मंच