गोर-गरिब शेतकºयांचे दु:ख दूर करण्यासाठी स्व. विखे यांचा देह सत्कारणी - पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:03 PM2020-10-13T12:03:06+5:302020-10-13T12:04:33+5:30
अहमदनगर : गोर-गरीब, शेतकºयांचे दु:ख जाणने, त्यांचे दु:ख दूर करणे हेच स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन होते. याचसाठी त्यांनी आपला देह सत्कारणी लावला, असे गौरवोद्वगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
अहमदनगर : गोर-गरीब, शेतकºयांचे दु:ख जाणने, त्यांचे दु:ख दूर करणे हेच स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन होते. याचसाठी त्यांनी आपला देह सत्कारणी लावला, असे गौरवोद्वगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
स्व. विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे व्हॅर्च्युअल प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्व. विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, शेतकरी, सामान्यांचे जीवन सोपे करणे हे स्व. विखे पाटील यांचा जीवनाचा मंत्र ठरला. समाजासाठीच राजकारण व सत्ता हे मी कायम संभाळले. राजकारण करताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठीच त्यांचाभर राहिला. सत्ता व राजकारणाचा उपयोग त्यांनी सामान्यांच्या उद्धारासाठीच केला.
गाव आणि गरिबांच्या समस्यांचे समाधान कसे होईल, हाच त्यांचा विचार होता. गाव, गरीबांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, महाराष्ट्रातील सहकाराचा विकास करण्यासाठी त्यांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. युवापिढीसाठी त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. गाव,गरिब आणि शेतकºयांचे दु:ख त्यांनी जवळून पाहिले. त्यांना सरकारशी जोडले, हे विखे पाटलांचे प्रयत्न राहिले. अनेक गावांचा चेहरामोहरा त्यांनीबदलला.
सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्या जातीची किंवा धर्माची नाही. आतापर्यंत सगळ््या समाजाला प्रतिनिधीत्त्व दिले आहे. हाच सहकाराचा विचार त्यांनी मांडला. सहकारात सर्व वर्गाचे प्रतिनिधीत्त्व होते. सर्वांच्या कल्याणाचा सहकार हा मार्ग राहिला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी संपूर्ण देशात सहकाराचा विकास करण्यासाठी प्रचार केला. ग्रंथाचे शिर्षक हे प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराज यांच्या या पंक्तीमध्ये स्व. विखे पाटील यांच्या कार्याचे सार आहे.
प्रवरा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी युवकांना शिक्षण, कौशल्याच्या विकासाचा मार्ग दिला. युवकांना प्रेरणा दिली. म्हणूनच प्रवरा संस्थेला स्व. बाळासाहेब यांचे नाव सार्थ आहे. गावामध्ये शेती आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. व्यक्ती कितीही मोठा असला तरी शेतीचे कौशल्य नसेल तर तो काहीही करू शकत नाही.
शेती ही निसर्गाधारीत, असावे. हेच त्यांनी सांगितले. शेतीच्या प्रगतीसाठी जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा मेळ घालून प्रगती करण्याची गरज आहे. कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रगतीसाठी प्रोत्साहन देत आहे. हा पैसा शेतकºयांच्याच खिशात येईल. पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाणी परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी काम केले.