मंगल कार्यालयात २०० लोकांना परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:07+5:302021-03-29T04:14:07+5:30

याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर, उपाध्यक्ष मदन आढाव, सचिव चंद्रकांत फुलारी, ...

Allow 200 people in the Mars office | मंगल कार्यालयात २०० लोकांना परवानगी द्या

मंगल कार्यालयात २०० लोकांना परवानगी द्या

याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर, उपाध्यक्ष मदन आढाव, सचिव चंद्रकांत फुलारी, अजिंक्य पवार, राजेंद्र उदागे, जालिंदर कोतकर, जयंत जाधव, संजय जाधव, अभिमन्यू नय्यर, अमित मुथा, प्रमोद लगड, रमाकांत गाडे उपस्थित होते.

शहरातील मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स यांचा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या ते होरपळून निघाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांच्या कर्जामुळे मंगल कार्यालय मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोविडचे संकट दूर होत असताना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालये, हॉल चालक यांच्यावर शासनाचे नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. मंगल कार्यालय असोसिएशनचे सर्व सदस्य शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून ५० ऐवजी २०० लोकांना कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी.

भगवान फुलसौंदर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे मान्य असले तरी नियमांचे पालन करून अनेक व्यवसाय सुरू आहेत. त्याच धर्तीवर मंगल कार्यालये, लॉन्समधील कार्यक्रमांना २०० लोकांची परवानगी मिळावी. कोणत्याही धार्मिक, लग्न, कौटुंबिक कार्यक्रमासाठी घरातीलच १०० लोक असतात. जवळचे नातेवाईक त्याचबरोबर सजावटकार, आचारी, केटरर्स, फोटोग्राफर, बॅण्ड-स्पिकर, भटजी आदींचा विचार केल्यास ही संख्या किमान २०० पर्यंत जाते. त्यामुळे या परवानगीची मागणी केली आहे. कोरोनामुळे या कार्यक्रमांवर अवलंबून असणारे अनेक कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता पुन्हा काही दिवस ही परिस्थिती राहिली तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, त्याचबरोबर मालकांवरही कर्जाचा बोजा वाढून ते आर्थिक संकटात सापडतील.

यावेळी अहमदनगर जिल्हा हॉटेल, परमिट रूम असोसिएशनच्या वतीनेही जिल्हाध्यक्ष हेमंत जाधव यांनीही नियमात शिथिलता देण्यासाठी निवेदन दिले. याप्रसंगी सचिव डॉ.अविनाश मोरे, अनिल बोराटे, प्रशांत बोरुडे, अनिल ससाणे, अर्जुन बोरुडे आदी उपस्थित होते.

..............

फोटो - मंगल कार्यालय

Web Title: Allow 200 people in the Mars office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.