भुईकोट किल्ला परिसरात भुईकोट सवारी उपक्रमास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:33+5:302021-09-26T04:23:33+5:30

निवेदनात म्हटले आहे की, २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहर व परिसरातील पर्यटन ...

Allow Bhuikot riding activities in Bhuikot fort area | भुईकोट किल्ला परिसरात भुईकोट सवारी उपक्रमास परवानगी द्या

भुईकोट किल्ला परिसरात भुईकोट सवारी उपक्रमास परवानगी द्या

निवेदनात म्हटले आहे की, २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहर व परिसरातील पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणी नागरिकांसाठी उपक्रम राबविण्याचा मानस आहे. नगर शहरात भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, रणगाडा संग्रहालय, फराहबक्ष महाल यासारखी ऐतिहासिक परंपरा व वारसा असलेली अनेक पर्यटन स्थळे आहेत.

नव्या पिढीला या पर्यटन स्थळांची माहिती व्हावी, यासाठी २७ सप्टेंबरला भुईकोट सवारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील बग्गी चालकांच्या सहभागातून भुईकोट किल्ल्याला फेरफटका मारून किल्ल्याचा इतिहास, माहिती देण्यात येणार आहे. मागील काही काळात किल्ला परिसराचा विकास झाला आहे. सध्या पावसाळ्यात हा परिसर निसर्गरम्य झाला असून, परिसरात नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा म्हणून या उपक्रमास परवानगी द्यावी, असे कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Allow Bhuikot riding activities in Bhuikot fort area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.