कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:05+5:302021-01-16T04:25:05+5:30
या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनंतर अनेक व्यवहार सुरळीत झाले आहेत. काेचिंग क्लास सुरू करण्यास अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नाही. ...
या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनंतर अनेक व्यवहार सुरळीत झाले आहेत. काेचिंग क्लास सुरू करण्यास अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नाही. पुणे महापालिका आयुक्तांनी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. नगरमध्येही परवानगी द्यावी. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुणांनी खासगी क्लासेस सुरू केले आहेत. यासाठी अनेकांनी कर्ज काढून गुंतवणूक केली आहे. क्लास बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. क्लास सुरू करण्यातस परवानगी दिली नाही, तर तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब कीर्तने, रोहित रामदिन, आनंद पोळ, विजय शेठे, सच्चिदानंद घोणसे, रवींद्र काळे, विजय कांडके, श्रीकांत सोनटक्के, विवेक धर्माधिकारी, किरण कालरा, भगवान गवते, संदीप घुमरे आदी उपस्थित होते. (वा.प्र.)
फोटो १५ टीचर असोसिएशन
ओळी- कोचिंग क्लासेस सुरू करावेत, या मागणीसाठी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.