चाचण्या कमी झाल्या तरी पॉझिटिव्ह रेट वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:12+5:302021-05-06T04:22:12+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात गत महिन्यात कोरोनाच्या चाचण्या सरासरी ७ ते ८ हजार व्हायच्या. त्यावेळी चाचण्यांपैकी कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा दर ...
अहमदनगर : जिल्ह्यात गत महिन्यात कोरोनाच्या चाचण्या सरासरी ७ ते ८ हजार व्हायच्या. त्यावेळी चाचण्यांपैकी कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा दर हा सरासरी ३२ ते ३५ टक्के होता. सध्या दिवसाला सरासरी १० हजार चाचण्या होत आहेत. चाचण्या वाढल्या तरी पॉझिटिव्ह येण्याचा दर कायम आहे, तर काही दिवस चाचण्यांची संख्या कमी असूनही पॉझिटिव्ह येण्याचा दर तब्बल १० टक्क्यांनी वाढलेला दिसतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात सध्या दिवसाला सरासरी चार हजार जण पाॅझिटिव्ह येत आहेत. गत महिन्यात हे प्रमाण ३ ते ३ हजार ५०० इतके होते. चाचण्यांची संख्याही सात ते आठ हजार इतकी होती. त्यावेळी सरासरी पॉझिटिव्ह येण्याचा दर हा ३५ टक्के होता. मात्र एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये चाचण्यांची संख्या कमी झालेली आहे. असे असतानाही कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा दर वाढलेला दिसत आहे. चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्याही वाढली असून पॉझिटिव्ह रेटही वाढलेला दिसतो. दुसरीकडे चाचण्या कमी झाल्या तरी रुग्णसंख्या व पॉझिटिव्ह रेट दोन्हीही वाढलेला असल्याचे दिसते आहे.
------------
आडवा ग्राफमधील आकडेवारी
तारीख चाचण्या रुग्ण पॉझिटिव्ह रेट
११ एप्रिल ७,३२१ २,४१४ ३२.९७
१३ एप्रिल ८,३८४ २,६५४ ३१.६६
१५ एप्रिल ८,४९२ ३,०९७ ३६.४७
१७ एप्रिल ९,२६७ ३,२८० ३५.३९
१८ एप्रिल १०,१९० ३,५९२ ३५.२५
२१ एप्रिल ९,४९७ ३,११७ ३२.८२
२३ एप्रिल ११,७४३ ३,७९० ३२.२७
३० एप्रिल ९,९३६ ३,९५३ ४१.०२
१ मे ९,९६२ ४,११९ ४२.३५
------------
आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या जास्त
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २९ हजार ४९५ एवढ्या चाचण्या रॉपिड ॲंटीजेन चाचण्या झालेल्या असून हे प्रमाण ४६.०८ टक्के इतके आहे. तर आतापर्यंत ७ लाख १५ हजार ८१ एवढ्या आरटीपीसीआर चाचण्या झालेल्या आहेत. हे प्रमाण ५३.९२ टक्के इतके आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमधून सर्वाधिक कोरोना पाॉझिटिव्ह येत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
--------
ग्रामीणमध्ये सर्वाधिक रुग्ण
एप्रिल महिन्यामधील आकडेवारीवरून नगर शहरापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. नगर शहरात एका आठवड्यात सरासरी तीन ते चार हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर ग्रामीण भागात एका आठवड्यात सरासरी १५ ते १६ हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
---------------
गत महिन्यात चाचण्यांची संख्या वाढली. तसेच संपर्कातील लोकांच्या ही चाचण्या करून घेण्यात आल्या. त्यासाठी महापालिका, ग्रामीण आरोग्य विभागाने चांगली मेहनत घेतली. यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत झाली. कुटुंबात एखादा पॉझिटिव्ह आलेला असेल तर कुटुंबातील इतर सदस्यही चाचण्या करून घेत आहेत. ते संपर्कात आल्याने त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रेट वाढलेला दिसतो.
-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक
----------
डमी - नेट फोटो
०४ टेस्टिंग ऑफ कोरोना डमी
कोरोना (३)