माजी विद्यार्थ्यांचा कोविड सेंटरला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:05+5:302021-05-08T04:21:05+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे सुरू असलेल्या पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरास येथील दहावीच्या १९९२ सालच्या ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे सुरू असलेल्या पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरास येथील दहावीच्या १९९२ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला आहे.
पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांनी देवदैठण आणि परिसरात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णांना उपचारार्थ सामाजिक बांधिलकीतून श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत हे कोविड सेंटर सुरू केले आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्याला सकारात्मक प्रतिसाद देताना परिसरातून अनेकांनी वेगवेगळ्या रूपाने मदतीचा हात दिला. यामध्ये विद्याधाम प्रशालेच्या दहावीच्या १९९२ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रोख २० हजार रुपयांची मदत केली. शिक्षिका शोभा कोकाटे, उद्योजक वसंत बनकर, शिक्षक बाबय्या भंडारी यांनी पुढाकार घेऊन ही रक्कम पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व प्रतीक वाघमारे यांच्याकडे सुपूर्द केली.
या वेळी नामदेव शेळके, दीपक वाघमारे, रावसाहेब सोनूळे, रावसाहेब दरेकर, तुषार लोखंडे आदी उपस्थित होते.
नेव्हीमध्ये कार्यरत असणारे देवदैठणचे सुपुत्र हर्षद बबन वाघमारे यांनी १० हजार १०० रुपये मदत पाठविली आहे.
आप्पासाहेब गुंजाळ हे रुग्णांसाठी भोजन तयार करतात तर प्रतीक वाघमारे, सचिन माने, सूरज मुळे, मनीष निघुल, किशोर गायकवाड हे तरुण रुग्णांची देखभाल करतात.
---
०७ देवदैठण
देवदैठण येथील कोविड सेंटरला माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शोभा कोकाटे, उद्योजक वसंत बनकर, बाबय्या भंडारी यांनी मदतीची रक्कम पं. स. सदस्या कल्याणी लोखंडे व प्रतीक वाघमारे यांच्याकडे सुपूर्द केली.