हौशी नाट्य स्पर्धा : उद्या उघडणार ‘राज्य नाट्य’चा पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 02:16 PM2018-11-14T14:16:32+5:302018-11-14T14:16:45+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे.
अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. माउली सभागृहात रोज सायंकाळी ८ वाजता नगरकरांना दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळणार आहे.
राज्यातील सर्वाधिक प्रतिसाद असलेल्या नगर केंद्रावर या वर्षी तब्बल १९ नाट्य संस्थांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे़ १५ नोव्हेंबर रोजी ‘तुकाराम कोळ्याची पोर’ (अपंग विकास संस्था, श्रीरामपूर), १६ नोव्हेंबरला ‘मुंबई मान्सून’ (एकात्मता मंच, नगर), १७ नोव्हेंबरला ‘छत्रपती शिवरायांचा जिहाद’ (एफ़ के़ क्रिएशन, शेवगाव), १८ नोव्हेंबरला ‘तीस तेरा’ (जिप्सी प्रतिष्ठान, नगर), १९ नोव्हेंबरला ‘ती खिडकी’ (कलासाई नाट्यसंस्था), २० नोव्हेंबरला ‘अनफेअर डील’ (कर्णेज अकॅडमी, श्रीरामपूर), २१ नोव्हेंबरला ‘द ग्रेट एक्सचेंज’ (नगर अर्बन बँक), २२ नोव्हेंबरला ‘पुत्रकामेष्टी’ (देऊळगाव), २३ नोव्हेंबरला ‘उदरभरणम्’ (नटेश्वर मंडळ, राहुरी), २४ नोव्हेंबरला ‘आणखी एक द्रोणाचार्य’ (नाट्य आराधना, नगर), २५ नोव्हेंबरला ‘भयरात्र’ (नवरंग प्रतिष्ठान, शेवगाव), २६ नोव्हेंबरला ‘अशुद्ध बीजापोटी’ (रंगकर्मी प्रतिष्ठान, नगर), २७ नोव्हेंबरला ‘प्रभाग’ (रंगोदय प्रतिष्ठान), २८ नोव्हेंबरला ‘इथॉस’ (साईप्रित प्रतिष्ठान, नगर), २९ नोव्हेंबरला ‘नजरकैद’ (समर्थ प्रतिष्ठान, घोडेगाव), ३० नोव्हेंबरला ‘आणि धम्म’ (सप्तरंग थिएटर्स, नगर), १ डिसेंबरला ‘ओझं’ (सर्व मंगल संस्था, नगर), ३ डिसेंबरला ‘प्यादं’ (स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळ, नगर), ४ डिसेंबरला ‘बाईपण’ (विश्वकर्मा क्रीडा मंडळ) ही नाटके होणार आहेत़
ग्रामीण नाट्य संस्थांचा सहभाग वाढला
स्पर्धेत दरवर्षी ग्रामीण नाट्य संस्थांचा सहभाग कमी असतो़ मात्र, यंदा तब्बल आठ ग्रामीण संस्थांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे़ श्रीरामपूर, शेवगाव, कोपरगाव, देऊळगाव (ता़ नगर), राहुरी, घोडेगाव (ता़ नेवासा) येथील नाट्य संस्था या वर्षी नगरकरांसाठी उत्तम सादरीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत़ त्यादृष्टीने त्यांच्या तालमीही सुरु आहेत.
सलग तिसऱ्या वर्षी मेहेत्रे समन्वयकपदी
राज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर दरवर्षी नवीन समन्वयक दिला जात होता़ मात्र, सलग तिसºयावर्षी सागर मेहेत्रे यांच्यावर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने विश्वास दाखवत त्यांना समन्वयकपदी नियुक्त केले आहे़ गुरुवारी (दि़१५) सायंकाळी ७ वाजता माउली सभागृहात ज्येष्ठ रंगकर्मी डॉ़ सोमनाथ मुटकुळे, दीपक घारु यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.