लग्नाच्या अमिषाने वरपित्याला गंडविले : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:36 AM2018-06-05T10:36:52+5:302018-06-05T10:38:31+5:30

आपल्या मुलीशी लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या मुलीचा पिता व मध्यस्थी करणारे अशा ५ जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक के लेली आहे.

Amisha's wife confessed to harassing her | लग्नाच्या अमिषाने वरपित्याला गंडविले : तिघांना अटक

लग्नाच्या अमिषाने वरपित्याला गंडविले : तिघांना अटक

शेवगाव : आपल्या मुलीशी लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या मुलीचा पिता व मध्यस्थी करणारे अशा ५ जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक के लेली आहे.
याबाबत रामनाथ अर्जुन हारदे (रा. गोटुंबे आखाडा, ता.राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘माझा मुलगा गणेश याचे गोपीनाथ जगन्नाथ जाधव (रा. बेलगाव ता. शेवगाव) यांच्या मुलीशी लग्न जमले होते. त्यासाठी शिवाजी रावसाहेब बनसोडे व रावसाहेब भिमाजी बनसोडे (रा. मळेगाव ता. शेवगाव) व दोन अनोळखी महिला यांनी मध्यस्थी केली होती. तसेच २७ मे रोजी विवाहाची तारीख निश्चित केली होती. त्या अगोदर शेवगाव येथील एका कापड दुकानात लग्नाच्या बस्त्याची खरेदी झाली. तसेच लग्नाच्या खर्चासाठी ५० हजार रुपये मुलीचे वडील व मध्यस्थांनी माझ्याकडून घेतले. परंतु लग्नाच्या अगोदरच्या दिवशी मुलीच्या वडिलांनी रात्री १२ वाजता फोन करून मुलगी कोठे तरी पळून गेली आहे, आम्ही तुमच्या मुलाबरोबर तिचे लग्न लावून देऊ शकत नाही. तुमचे पैसेही परत देणार नाही,’ असे सांगितले.
पोलिसांनी या गुन्ह्यात मुलीचे वडील गोपीनाथ जगन्नाथ जाधव, मध्यस्थ शिवाजी रावसाहेब बनसोडे व रावसाहेब भिमाजी बनसोडे या तिघांना अटक केली आहे. परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. निलभ रोहण, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाँस्टेबल संतोष धोत्रे तपास करीत आहेत.

 

Web Title: Amisha's wife confessed to harassing her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.