आनंद नलगेची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:34+5:302021-04-05T04:19:34+5:30
आनंदची एप्रिल महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या ६४ व्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. आनंद हा ...
आनंदची एप्रिल महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या ६४ व्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.
आनंद हा शिरूर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी येथे बी. फार्मसीचे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असून संदीप व शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा सराव करीत आहे. प्राचार्य बाहेती यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल त्याचे श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे, उपाध्यक्ष धनंजय थिटे, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बी. के. लगड, सचिन लगड, दिलीप काटे यांनी कौतुक केले.
....................................
सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकांकडून मदत
संगमनेर : विशाल काळे यांनी अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील जळीतग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. कोंभाळणे येथील आदिवासी ठाकर समाजातील बांधवांचे घराचे जळीत झाल्यामुळे ते कुटुंब उघड्यावर पडले. संपूर्ण जीवनपयोगी साहित्य जळून राख झाले. या पोस्टवर खासदार सुप्रिया सुळे, मंत्री बच्चु कडू, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी या मुलाकरिता मदत देण्याच्या सूचना केल्या. संगमनेर व अकोले तालुक्यातील विविध स्वयंसेवी संस्था यांच्यावतीने या कुटुंबासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. संगमनेरचे अभिजीत बेंद्रे यांनी त्या मुलाकरिता सायकल दिली आहे. सोशल मीडियातून झालेली तत्परता ही अत्यंत उल्लेखनीय ठरत आहे.