माणसांसह जनावरांच्या भुकेचीही घेतली लंगर सेवेने काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:21 AM2021-05-11T04:21:03+5:302021-05-11T04:21:03+5:30

नगर शहरात सोमवारी आमदार संग्राम जगताप व शहराचे विभागीय पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या उपस्थितीमध्ये जनावरांसाठी अडीच टन चाऱ्याचे ...

The anchor service took care of the hunger of the animals as well as the people | माणसांसह जनावरांच्या भुकेचीही घेतली लंगर सेवेने काळजी

माणसांसह जनावरांच्या भुकेचीही घेतली लंगर सेवेने काळजी

नगर शहरात सोमवारी आमदार संग्राम जगताप व शहराचे विभागीय पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या उपस्थितीमध्ये जनावरांसाठी अडीच टन चाऱ्याचे वाटप करण्यात आले.

शेतातून टेम्पो भरून आणलेला घास शहर परिसरातील पांजरपोळ गो-शाळा, अरुणोदय गो-शाळा, शकुंतला गो-शाळा गवळीवाडा, सुयश गो-शाळा आदी ठिकाणी वाटण्यात आला. यावेळी आ. जगताप म्हणाले, कोरोनाच्या लढ्यात सर्वसामान्यांसाठी घर घर लंगर सेवा आधार ठरले आहे. टाळेबंदीत भुकेलेल्यांसह गरजू घटकांना दोन वेळचे जेवण पुरविण्यासह मुक्या जनावरांच्या चाऱ्याची देखील सोय करण्यात आली आहे. गरजू, मनुष्य व प्राण्यांसाठी लंगर सेवेने केलेली मदत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी घर घर लंगर सेवेत पोलीस प्रशासनदेखील सहभागी असल्याचा अभिमान वाटत आहे. या सेवेने गरजूंसह मुक्या प्राण्यांनादेखील आधार मिळाला आहे. या संकटकाळात प्रत्येकाने आपली जबाबदारी उचलण्याची गरज असून, प्रशासनाला देखील सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

हरजितसिंह वधवा यांनी पहिल्या टाळेबंदीप्रमाणे दुसऱ्या टाळेबंदीतही मुक्या जनावरांचा प्रश्‍न अधिक गंभीर झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने हिरवा चारा मिळणेदेखील अवघड झाले होते. शहरातील मुकी जनावरे भुकेने व्याकुळ झाली असताना त्यांना घास उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी लंगर सेवेचे हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी, राहुल बजाज, राजा नारंग, सतीश गंभीर, राजेंद्र कंत्रोड, सनी वधवा, आदित्य छाजेड, कबीर धुप्पड, टोनी कुकरेजा, राजेश कुकरेजा, मन्नू कुकरेजा, सुरेश कुकरेजा, काली लालवानी, सिमर वधवा, नारायण अरोरा, गोविंद खुराणा, जय रंगलानी, राहुल शर्मा, शरद बेरड, राजवंश धुप्पड, अजय पंजाबी, प्रमोद पांतम, पुरुषोत्तम बेती, संदेश रपारिया, सुनील मुळे, विपुल शाह यांनी परिश्रम घेतले.

फोटो -१० घर घर लंगर सेवा

ओळी- घर घर लंगर सेवेच्यावतीने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. यावेळी उपअधीक्षक विशाल ढुमे. समवेत हरजितसिंग वधवा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी आदी.

Web Title: The anchor service took care of the hunger of the animals as well as the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.