अन् विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले !
By Admin | Published: October 29, 2016 12:12 AM2016-10-29T00:12:32+5:302016-10-29T00:42:16+5:30
पारनेर : घरातील परिस्थितीेने वसतीगृहात राहून शिक्षणाचा पाया रचणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पारनेर येथील नीलेश खोडदे
पारनेर : घरातील परिस्थितीेने वसतीगृहात राहून शिक्षणाचा पाया रचणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पारनेर येथील नीलेश खोडदे युवा प्रतिष्ठानने विद्यार्थी शैक्षणिक दृष्टया दत्तक घेतलेच शिवाय त्यांना दिवाळीसाठी खास कपडे व फराळ मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हासुही फुलले.
वसतिगृृहात पारनेर तालुक्यातील शेतकरी व बहुजन समाजातील मुले रहातात. पारनेर शहरातील निलेश खोडदे युवा प्रतिष्ठानचे नीलेश खोडदे व युवकांनी सिध्दार्थ वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती व त्यांची शाळेतील हजेरी, गुणवत्ता याविषयी माहिती घेतली. गुणवत्ता चांगली आहे पण आर्थिक परिस्थितीने खचलेल्या या विद्यार्थ्यांना आपण शालेय दृष्टया मदत करायचीच पण त्यांच्याही जीवनात दिवाळीचा आनंद साजरा होण्यासाठी प्रत्येकाला नवीन कपडे व दिवाळी फराळ, साहित्य घेण्याचे ठरले. निलेश खोडदे, सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके, युवा सेनेचे तालुका अधिकारी राहुल झावरे, बाजार समितीचे संचालक युवराज पाटील, डॉ.बाळासाहेब कावरे, शिक्षक नेते संभाजी औटी, शंभू दुधाडे, संजय रेपाळे, बाबाजी रेपाळे, अरूण रेपाळे, श्रीकांत चौरे, विजय डोळ, गौतम साळवे, सतीश म्हस्के, संतोष चेडे, कैलास श्रीमंदीलकर, सुभाष औटी आदींच्या उपस्थितीत कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ.बाळासाहेब कावरे यांनी विद्यार्थ्यांना औषधोपचार व उपचार विनामोबदला करण्याचे जाहीर केले. बाजार समिती संचालक युवराज पाटील यांनी वसतिगृहास दोन पंखे भेट दिले. गौतम साळवे, वसतीगृह अधिक्षक संपत पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.