संतप्त शेतकऱ्यांचा राशीनच्या वीज वितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:45+5:302021-04-06T04:20:45+5:30

राशीन : कर्जत तालुक्यातील तळवडी, बारडगाव व येसवडी या तीन गावांच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने ...

Angry farmers sit in Rashin's electricity distribution office | संतप्त शेतकऱ्यांचा राशीनच्या वीज वितरण कार्यालयात ठिय्या

संतप्त शेतकऱ्यांचा राशीनच्या वीज वितरण कार्यालयात ठिय्या

राशीन : कर्जत तालुक्यातील तळवडी, बारडगाव व येसवडी या तीन गावांच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी राशीन वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे व प्रश्नांची सरबत्ती करीत येत्या तीन दिवसांत विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, रोज तीन ते चार तास वीज सुरू असते. त्यामध्येही सतत अर्ध्या, एक तासाला वीज बंद केली जाते. त्यामुळे पूर्ण दाबाने व क्षमतेने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यात आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ठराविक शेतकरीच विहिरीवर व शेतळ्यावर अवलंबून असतात. त्यांनाही पाणी असून, विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्य होते. पिके जळण्याची भीती आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी राशीन येथील वीज वितरण कार्यालयावर सकाळी अकरा वाजल्यापासून बसले होते; परंतु शाखा अभियंता नसल्यामुळे राशीन दूर क्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिरसाट व पोलीस कॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते यांनी मध्यस्थी करीत सहायक अभियंता संदीप जाधव यांच्याशी संवाद साधून पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी भुजंग कदम, शहाजी कदम, दत्ता ढगे, अतुल सौताडे, नवनाथ काळे, विकास थोरात, मनोहर ढगे, भाऊ निंभोरे, भाऊ राऊत, भरत कदम, शशिकांत लेणे, सद्दाम काझी, रौफ काझी, नीलेश केदारी आदी उपस्थित होते.

०५ : तळवडी, बारडगाव व येसवडी गावचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी शाखा अभियंत्याला घेराव घातला.

Web Title: Angry farmers sit in Rashin's electricity distribution office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.