राज्य अल्पसंख्याक आयोगावर अनिल भोसले यांना संधी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:15 AM2021-06-28T04:15:44+5:302021-06-28T04:15:44+5:30

परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका सर्वधर्मीय समाजाचे कारभारी देव्हारे, डॉ. संतोष खेडलेकर, नंदकिशोर बेल्हेकर, सादिक तांबोळी, ...

Anil Bhosale should get a chance on the State Minorities Commission | राज्य अल्पसंख्याक आयोगावर अनिल भोसले यांना संधी मिळावी

राज्य अल्पसंख्याक आयोगावर अनिल भोसले यांना संधी मिळावी

परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका सर्वधर्मीय समाजाचे कारभारी देव्हारे, डॉ. संतोष खेडलेकर, नंदकिशोर बेल्हेकर, सादिक तांबोळी, नीतेश शहाणे, आसिफ शेख, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटगे, भाऊसाहेब वैद्य, अमित पाटणकर, विलास राऊत, प्रशांत यादव, दीपक कतारी, भारत रेघाटे, विनायक गुजेटी, सनी गायकवाड, सचिन मनतोडे, मायकल कोपरे, फ्रान्सिस रोहम, किरण नेहूलकर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भोसले समाजामध्ये कार्यरत असून, ख्रिस्ती समाजासह अन्य समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, सर्व ख्रिस्ती पंथीयांना एकसंध एका छत्राखाली आणण्यासाठीच्या योगदानाबरोबरच समाजातील समस्या सोडविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून ते करत आहेत. सातत्यपूर्ण समाजासोबत कृतिपूर्ण सलोखा राखल्यामुळे समाजातील व राज्याबाहेरील ख्रिस्ती समाजात ते परिचित असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ख्रिस्ती समाजाचे संघटन अधिक मजबूत करून त्यांच्या अंगभूत संघटन कौशल्याचा अल्पसंख्याक समाजासह राज्य सरकारलाही निश्चितच लाभ होईल. तरीही राज्य अल्पसंख्याक आयोगावर भोसले यांची वर्णी लावावी, अशी मागणी ख्रिस्ती समाज व सर्वधर्मीय संघटना व समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे.

Web Title: Anil Bhosale should get a chance on the State Minorities Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.