पशुसंवर्धन विभागाने वाटली १ लाख अंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:31 PM2017-10-13T16:31:49+5:302017-10-13T16:35:02+5:30
शरीराची प्रतिकारशक्ती वाढून उत्कृष्ट पोषणमूल्य मिळण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे नियमित सेवन आवश्यक आहे. अंड्यातून शरीराला आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे,ऊर्जा, खनिजे, स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात.
अहमदनगर : जागतिक अंडी दिनानिमित्त पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाभरात १ लाख उकडलेल्या अंड्यांचे मोफत वितरण करण्यात आले.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांच्या हस्ते अंडी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. थोरे म्हणाले, शरीराची प्रतिकारशक्ती वाढून उत्कृष्ट पोषणमूल्य मिळण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे नियमित सेवन आवश्यक आहे. अंड्यातून शरीराला आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे,ऊर्जा, खनिजे, स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठीच अंडी हा उच्च पोषणमूल्य देणारा, सहज उपलब्ध होणारा स्वस्त व समतोल आहार आहे. प्रत्येकाने याचे नियमित सेवन करायला हवे, असे डॉ. थोरे यांनी सांगितले़ यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.अनिल बोठे, डॉ. अशोक ठवाळ, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ.वृषाली भिसे, शर्वरी पंधाडे, डॉ.विनोद गोतारणे, राहुल कांबळे, विजय टोरपे, डॉ.कुलदीप चौरे, राजकुमार चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, दिनेश शिंदे, अजय गुगळे, डॉ. बाबासाहेब कडूस आदी उपस्थित होते. अंडी दिनानिमित्त विविध बालगृह, आश्रमशाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी लहान मुलांसह मोठ्यांनाही उकडलेल्या अंड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.