पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:32+5:302021-05-26T04:21:32+5:30
अहमदनगर : पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काेरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्याअंतर्गत आरोग्य सुविधा, लसीकरण व ...
अहमदनगर : पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काेरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्याअंतर्गत आरोग्य सुविधा, लसीकरण व विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हा परिषदअंतर्गत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी सध्या शहरी तसेच ग्रामीण भागात सेवा देत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्रामीण, तसेच शहरी भागात पशुपालकांच्या घरी तसेच वाडी-वस्त्यांवर जाऊन सेवा द्यावी लागत आहे. यामुळे अनेक कर्मचारी आतापर्यंत कोरोना बाधित झाले आहेत. पशुसंवर्धन विभाग अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असून, या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा तसेच त्यांना कोविड विमा कवच, लसीकरण आणि औषधोपचारांमध्ये प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.