आदिवासींची डांगी जनावरांनाच पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:49 AM2019-04-17T11:49:14+5:302019-04-17T11:49:22+5:30
अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेक आदिवासी शेतकरी डांगीचे तांड्याने संगोपन व देखभाल करीत आहेत.
राजूर : अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेक आदिवासी शेतकरी डांगीचे तांड्याने संगोपन व देखभाल करीत आहेत.
मागील दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाने केलेल्या सर्वेनुसार तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेने डांगी जनावरांची संख्या कमी झालेली आहे. संकरित गायी दूध अधिक देत असल्याने अधिकाधिक शेतकरी या गायींनाच पसंती देत आहेत. असे असले तरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अनेक आदिवासी शेतकरी आपल्या पूर्व परंपरेने तांड्याने डांगी गायींचेच संगोपन करीत आहेत.
याबाबत भंडारदरा परिसरात गायी चारणारा शेतकरी गंगाराम झडे यांच्याशी सवांद साधला. यावेळी ते म्हणाले, डांगी गायी दुधाला कमी असतात. ही जात गावरान जनावरांत मोडते. यातील खरे उत्पन्न म्हणजे गोºह्यांचे असते. गायीला गोºहा झाल्यास शेतकरी गायीचे सर्व दूध त्यालाच देत असतात. याबरोबरच कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त पन्नास लहान मोठी जनावरे असल्याने शेणही भरपूर मिळते. एव्हढेच काय ते उत्पन्न.
वाडवडिलांपासून गायींचा कळप आहे तो सांभाळला पाहिजे. गाय लक्ष्मी आहे. फायदा तोटा याचा विचार कधीच केला नसल्याचे झडे आत्मविश्वासाने सांगत होते. भंडारदरा धरणाच्या लगतचा परिसरातही आता पाण्याबरोबर चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी पावसाळ्यात अचानक पाऊस गेला. भाताचे पीक तर हातचे गेले. भाताचा पेंढाही त्यामुळे कमी झाला. आमच्या जनावरांना भाताचा पेंढा हा मुख्य चारा असतो.
आता तोही कमी पडत चालला असल्याने खुरटलेला चारा चारण्याची वेळ आली असल्याची खंत माळरानावर गायी चारणारे चिंधू खाडे या शेतकºयाने सांगितले.
शेतकऱ्यांना फायदा
चारा आणि पाणी टंचाईची समस्या भेडसावत असतानाही आजही भंडारदरा, बारी, रतनवाडी, कोलटेंबे, मुतखेल आदी आदिवासी गावांमध्ये अनेक आदिवासी शेतकरी किमान तीस ते अधिक गायींचे कळप राखत गोधन जपत आहेत. गावठी गायींचे शेण,गोमूत्र आदींचा आयुर्वेदाच्या दृष्टीने होणाºया फायद्यांची कल्पना या शेतकºयांना मिळाल्यास त्यांचे उत्पन्नाचे साधन वाढेल.