गुरेवाडी-महारूळीच्या सरपंचपदी अंजली ढेपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:58+5:302021-03-18T04:19:58+5:30
जामखेड : गुरेवाडी-महारूळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या अंजली लक्ष्मण ढेपे यांची तर उपसरपंचपदी छबुराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. ...
जामखेड : गुरेवाडी-महारूळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या अंजली लक्ष्मण ढेपे यांची तर उपसरपंचपदी छबुराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली.
१० फेब्रुवारी रोजी महारूळी गुरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध निवड झाली होती. मात्र सरपंचपदाची निवड झालेली नव्हती. १५ मार्चला सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. सरपंचपदासाठी अंजली लक्ष्मण ढेपे व उपसरपंचपदासाठी छबुराव ठाकरे यांचेच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत माने यांनी घोषित केले.
आमदार रोहित पवार, प्रा. सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवड पार पडली.
निवडीबद्दल पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, शेतकरी संघटनेचे मंगेश अजबे, सुनील उबाळे, प्रवीण पोते, हनुमंत मुरुमकर, नान्नजचे सरपंच महेंद्र मोहळकर, अरुण माने, उपसरपंच छबुराव ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष ठाकरे, सुनीता अनपट, उज्ज्वला कोरडे, सोनाली जाधव, प्रकाश मुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
--
१७ गुरेवाडी
गुरेवाडी-महारूळी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला.