Anna Hazare Andolan : अहमदनगरमध्ये मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 12:34 PM2018-03-23T12:34:34+5:302018-03-23T12:36:53+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणा-या रेल्वे व बसेस सरकारने रोखल्यामुळे राळेगणसिद्धीत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणा-या रेल्वे व बसेस सरकारने रोखल्यामुळे राळेगणसिद्धीत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.
मोदी सरकारकडून 13 रेल्वे व अनेक बस अडवण्यात आल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12 वाजता मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
अण्णा हजारेंचा गंभीर आरोप
आमच्या आंदोलनात अडथळे आणले जात आहेत, असे म्हणत सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे हे रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. तत्पूर्वी, माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
आतापर्यंत आमच्या आंदोलनात कधीच हिंसाचार झालेला नाही. पण सरकारला काय अनुभूती आली काय माहीत असा सवाल उपस्थित करत आमच्या लोकांच्या बसेस आणि रेल्वे रोखण्यात येत असल्याचा आरोप केला. लोकशाहीसाठी हे ठीक नसल्याचे ते म्हणाले.