अण्णा हजारे-भापकर गुरूजींची भेट; जुन्या आठवणींना दिला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:53 PM2020-10-31T12:53:21+5:302020-10-31T12:54:42+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गुरुजींनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. जुन्या आठवणीना उजाळा देत अण्णांना गुंडेगाव भेटीचे आमत्रंण दिले. अनेक विषयांवर दोघांची चर्चा झाली.
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गुरुजींनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. जुन्या आठवणीना उजाळा देत अण्णांना गुंडेगाव भेटीचे आमत्रंण दिले. अनेक विषयांवर दोघांची चर्चा झाली.
भापकर गुरूजी यांनी स्वखर्चाने तयार केलेली रस्त्याच्या कामांची अण्णांनी माहिती घेतली. या कामात गुंडेगाव ग्रामस्थांचे मोेठे योगदान असल्याचेही भापकर गुरुजींनी अण्णांना सांगितले. गुंडेगाव परिसरात ८५० हेक्टरवर वनक्षेत्र निर्माण केले आहे. ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदवला. येथे येणाºया वन विभागाच्या अडचणी, भ्रष्टाचार निर्मूलन, जन आंदोलन या विषयावर दोघांनी चर्चा केली.
याप्रसंगी संजय भापकर, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण कुताळ, दादासाहेब जावळे उपस्थित होते.