गिरीश महाजनांना भेटण्यास अण्णा हजारेंचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 09:48 AM2019-01-30T09:48:01+5:302019-01-30T11:58:08+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (30 जानेवारी) पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत.
राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (30 जानेवारी) पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धी येथे येणार होते. मात्र गिरीश महाजन राळेगणसिद्धीला अण्णांच्या भेटीला येणार असले तरी अण्णांनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
गिरीश महाजन यांच्या हातात या आंदोलनाचा तोडगा काढण्यासारखे काहीच नसल्याने अण्णांनी यावेळी गिरीश महाजन यांच्या भेटीला नकार दिला आहे, जे काही आहे ते दिल्लीच्या हातामध्ये आहे अशी माहिती पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारेंनी दिली आहे. अण्णा हजारे हे आज सकाळी 10 वाजता संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला सुरुवात करणार आहेत. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी ठरल्यानुसार आपापल्या नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचे आजपासून उपोषण https://t.co/9Uye9LduFF
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 30, 2019
'हे माझं उपोषण कोणत्याही व्यक्ती, पक्षाविरुद्ध नाही. समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी सातत्याने आंदोलन करत आलोय. हे त्याच प्रकारचं आंदोलन आहे' असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. याविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने सरकारचे अभिनंदन करत आहे. कायदा तर विधानसभेत बनतो. त्यामुळे विधासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊनच कायदा बनने गरजेचे आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणार नाही.'
#Maharashtra: Anna Hazare begins his fast for the formation of Lokpal at the Centre and Lokayuktas in the states, at Ralegan Siddhi. pic.twitter.com/mICrZoq9xt
— ANI (@ANI) January 30, 2019