अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही- गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 03:37 PM2021-01-28T15:37:11+5:302021-01-28T15:37:44+5:30
राळेगणसिद्धी ( जि. अहमदनगर) : शेतक-यांबाबतचे कोणतेही निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली जाईल. केंद्रीय कृषी राज्यमंत्रीही राळेगणला येतील. अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली
राळेगणसिद्धी ( जि. अहमदनगर) : शेतक-यांबाबतचे कोणतेही निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली जाईल. केंद्रीय कृषी राज्यमंत्रीही राळेगणला येतील. अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली.
शेतक-यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणला उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाजन आणि विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री व राज्यमंत्र्यांची भेट घेतली..याबाबत केंद्राचे पत्र घेऊन महाजन गुरुवारी राळेगणसिद्धीत आले होते. त्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्थानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली जाईल. केंद्रीय कृषी राज्य मंत्री हे या समितीचे अध्यक्ष राहतील. हीच समिती सर्व निर्णय घेईल..या समितीत निमशासकीय सदस्य कोण कोण असणार आहेत, याबाबत अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. तसेच केद्रीय कृषी राज्यमंत्री हेही राळेगणसिद्धीला येतील, असे त्यांनी सांगितले.