अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा आज चौथा दिवस : ग्रामस्थांचे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 10:58 AM2019-02-02T10:58:53+5:302019-02-02T10:59:30+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सरकारच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रास्ता-रोको आंदोलन सुरु केले आहे.
राळेगणसिध्दी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सरकारच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रास्ता-रोको आंदोलन सुरु केले आहे. चौथ्या दिवशी सरकार कोणती भूमिका घेते याकडे लक्ष असणार आहे.
उपोषणामुळे अण्णा हजारे यांना अशक्तपणा आला आहे. वजन ही साडे तीन किलोने कमी झाले आहे. आज अण्णांना पूर्ण वेळ विश्रांती व मौन बाळगण्याचा सल्ला डॉ. धनंजय पोटे यांनी दिला आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी १० वाजता पारनेर - शिरूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.