अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:50+5:302021-01-20T04:21:50+5:30
केंद्र सरकारने दिल्लीत अजून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली व ...
केंद्र सरकारने दिल्लीत अजून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली व राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते. त्यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असणारा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या, असे सांगितले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही पिकांना हमीभाव दिला जात नाही. शेतकऱ्यांना बियाणे, नांगरणी खर्च धरून उत्पादन खर्चावर ५० टक्के खर्च धरून हमीभाव दिला पाहिजे, असे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी दूरच राहिली. उलट शेतकऱ्यांच्या पिकांच्या हमीभावामध्येच केंद्र सरकारने रक्कम कमी केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. केंद्रीय कृषिमूल्य आयोग सध्या कृषिमंत्री यांच्या अखत्यारीत असून, त्या आयोगाला स्वायत्तता द्यावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.
....
राळेगणसिद्धीतही आंदोलनाचा विचार
दिल्लीत अजून जागेची परवानगी नाही.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनासाठी रामलीला मैदान व इतर जागांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. अद्याप जागेची परवानगी सरकारने दिली नसल्याने राळेगणसिद्धीमधील संत यादवबाबा मंदिरात आंदोलन होऊ शकते, याचा विचार सध्या केला जात आहे.
...