राष्ट्रहिताची कामे केवळ भाषणे करून होत नाहीत, अण्णा हजारेंची मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:21 AM2018-12-27T05:21:01+5:302018-12-27T05:21:14+5:30
बलशाली भारतासाठी ग्रामविकासाला गती देणे व विकास कामांना लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबविणे समाज व राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : बलशाली भारतासाठी ग्रामविकासाला गती देणे व विकास कामांना लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबविणे समाज व राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण अशी कामे फक्त भाषणांनी होणार नाहीत. त्यासाठी उक्तीला कृतीची जोड देणारे, कथनी व करणीला जोड देणारे नेतृत्व हवे, अशा शद्बात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुधवारी प्रसिद्धी पत्रकातून निशाणा साधला.
हजारे म्हणतात, साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतरही केंद्र सरकारने आश्वासन देऊनही लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी केली नाही. तसेच, राज्यात लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे ३० जानेवारीस महात्मा गांधी पुण्यतिथीपासून राळेगणसिद्धीत बेमुदत उपोषण करणार आहे.