अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस : ग्रामस्थांचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:03 PM2019-02-02T13:03:10+5:302019-02-02T13:03:52+5:30
जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसले आहेत.
राळेगणसिद्धी : जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी १० वाजता पारनेर - शिरूर मार्गावर रास्ता रोको केला. तब्बल २ तासा पेक्षा अधिक रस्ता अडवून ग्रामस्थांनी सरकारचा निषेध केला. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वत:ला अटक करून घेऊन जेलभरो आंदोलन करत आंदोलनाला अधिक तीव्र केले.
यावेळी सरपंच प्रभावती पठारे, उपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, पंकज तिकोणे, माजी सरपंच जयसिंग मापारी, संपत उगले, रमेश औटी, संतोष खोडदे, दिलीप देशमुख, सुभाष पठारे, अशोक भालेकर, रोहिदास पठारे, महेंद्र गायकवाड, अरुण भालेकर, माधवराव पठारे, अरुण पठारे, रामभाऊ पठारे, माजी सैनिक बाळासाहेब पठारे, भिमराव पोटे, मोहन मापारी, गणेश भापकर, आकाश पठारे, गणेश भोसले, पांडुरंग भोसले, दत्तात्रय मापारी, माधवराव गायकवाड, हिराबाई पोटे, संगीता मापारी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.