जेल भरो आंदोलनास अण्णांचा पाठिंबा
By Admin | Published: May 19, 2014 11:41 PM2014-05-19T23:41:14+5:302024-06-26T18:33:52+5:30
अहमदनगर : पावसाळी अधिवेशना दरम्यान १२ जून रोजी मुंबईत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीने पुकारलेल्या जेल भरो आंदोलनास अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे.
अहमदनगर : पावसाळी अधिवेशना दरम्यान १२ जून रोजी मुंबईत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीने पुकारलेल्या जेल भरो आंदोलनास अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. देशातील सर्वात जास्त होमिओपॅथी डॉक्टर्स महाराष्ट्रात असूनही त्यांच्या समस्यांकडे राज्यसरकार लक्ष देत नाही. कृती समितीच्या आमरण उपोषण व अर्धनग्न मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी ठोस आश्वासन देऊनही काहीच उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांवरती पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. संघर्षाशिवाय समस्या सुटणार नाहीत. याच पार्श्वभूमीवरती कृती समितीने ९ जून पासून आझाद मैदानावरील धरणे आंदोलन व १२ जून रोजी जेल भरो आंदोलन राज्यसरकार विरुद्ध पुकारलेले आहे. लोकशाही व अहिंसेच्या मार्गाने सरकार विरुद्ध पुकारलेल्या या आंदोलनाचे मी समर्थनच करतो आहे. वेळप्रसंगी मी स्वत: या समस्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथील कृती समितीच्या राज्यस्तरीय मेळाव्यात केले. या मेळाव्यात राज्यामधून जिल्हा कार्यकारिणीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये एकूण आठ ठराव पारीत करण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत गाडगे, डॉ. रमेश गवळी, डॉ. विजय हरपाळे, डॉ. गोविंद भोरकडे, डॉ. विशाल सपकाळ, डॉ. राजेंद्र पाचपुते, डॉ. राजू मतसागर, डॉ. अनिल तनपुरे, डॉ. विकास दहातोंडे, डॉ. अनिता जाधव, डॉ. विजय काकडे, डॉ. शिवाजी जाधव व राज्यभरातून आलेले डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृती समितीचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत शिंदे, राज्य समन्वयक डॉ. विजय पवार, सचिव डॉ. संतोष अवचार, डॉ. संदीप दुधमल, डॉ. प्रकाश राणे, डॉ. उमेश हांडे, डॉ. सुरेखा फासे, डॉ. स्वप्निल महाजन, डॉ. रंजीत सत्रे, डॉ. सुशील सोळंके, डॉ. विनय गरुड, डॉ. वसीम सय्यद, डॉ. शिव गौड, डॉ. अबंळकर यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. अशोक भोजणे यांनी केले. आभार डॉ. अनिल करांडे यांनी मानले. (प्रतिनिधी)