‘व्यंकटेश’कडून वर्धापनदिनी शेतकऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:53+5:302021-01-10T04:15:53+5:30

बोधेगाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, त्यांच्या कष्टांचे मोल जपले पाहिजे. अशा शेतकऱ्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ...

Anniversary farmers honored by ‘Venkatesh’ | ‘व्यंकटेश’कडून वर्धापनदिनी शेतकऱ्यांचा सन्मान

‘व्यंकटेश’कडून वर्धापनदिनी शेतकऱ्यांचा सन्मान

बोधेगाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, त्यांच्या कष्टांचे मोल जपले पाहिजे. अशा शेतकऱ्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या भावनेतून व्यंकटेश मल्टीस्टेटच्या कोरडगाव शाखेच्या वर्धापनदिनी परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेचा मंगळवारी ७ वा वर्धापनदिन झाला. याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी वैष्णव आश्रमाचे सत्यविजय महाराज, पांडुरंग महाराज झुंबड, सेवा संस्थेचे अध्यक्ष गणपतराव काकडे, बाजार समितीचे संचालक मधुकरराव देशमुख, वृद्धेश्वरचे संचालक भाऊसाहेब किलबिले, सरपंच विष्णू देशमुख, व्यंकटेशचे संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शिंदे, उपाध्यक्ष व्यंकट देशमुख, संचालक अनिल गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा मसुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देहेडकर, विभागीय व्यवस्थापक अंबादास पांडे, व्यंकटेश फाउंडेशनचे सहकारी संचालक ज्ञानेश झांबरे, शाखा व्यवस्थापक गणेश जाधव, विकास अधिकारी राम तांबे आदी उपस्थित होते.

-----

फोटो ओळी ०९ बोधेगाव

व्यंकटेश मल्टीस्टेटच्या कोरडगाव शाखेच्या वर्धापनदिनी शेतकऱ्यांचा सन्मान करताना संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शिंदे व इतर.

Web Title: Anniversary farmers honored by ‘Venkatesh’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.