राज्य सरकारची घोषणा हवेतच विरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:30+5:302021-01-04T04:19:30+5:30
कर्जत : राज्य सरकारने पत्रकारांना मदत करण्याबाबत केलेली घोषणा हवेतच विरली. कोणालाही मदत अद्याप दिलेली नाही. ही खेदाची बाब ...
कर्जत : राज्य सरकारने पत्रकारांना मदत करण्याबाबत केलेली घोषणा हवेतच विरली. कोणालाही मदत अद्याप दिलेली नाही. ही खेदाची बाब आहे. कर्जतच्या प्रबोधनकार प्रतिष्ठानने रायकर कुटुंबीयांचा सन्मान केला. यातून तरी राज्य सरकारने बोध घ्यावा व रायकर कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत करावी, असे आवाहन माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
येथील प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार पांडुरंग रायकर यांना मरणोत्तर कोरोनायोद्धा पुरस्कार तर त्यांच्या मातोश्री जिजाबाई रायकर यांना वीरमाता पुरस्कार जाहीर केला होता. रविवारी कर्जत येथील कार्यक्रमात हे पुरस्कार रायकर यांच्या मातोश्री जिजाबाई रायकर व पत्नी शीतल रायकर यांनी स्वीकारले. यावेळी शिंदे बोलत होते.
अध्यक्षस्थानी दयानंद महाराज कोरेगावकर होते. यावेळी खा. डॉ. सुजय विखे, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, संयोजक सचिन पोटरे, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उपाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, ज्ञानेश्वर पठाडे, डॉ. सुनील गावडे, वैभव शहा, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.
(फोटो ०३ कर्जत रायकर)
कर्जत येथे खा. डॉ. सुजय विखे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते जिजाबाई रायकर यांना वीरमाता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शीतल रायकर व इतर.