पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:27+5:302021-03-31T04:22:27+5:30

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर व उपाध्यक्ष तथा ...

Annual meeting of Irrigation and Public Works Department Employees Co-operative Credit Society | पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर व उपाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ज्ञा. पवार तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष नारायणराव पो. तमनर व माजी उपाध्यक्षा प्रियंका मिसाळ होत्या. सभेत अध्यक्ष उमेश डावखर, उपाध्यक्ष अजय लखापती आदींसह संचालक उपस्थित होते. दिवंगत सभासद व संघटनेचे रा.गो. कर्णिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा सुरू झाली. सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा करून विविध प्रश्‍न मांडले. त्या प्रश्‍नांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हळगावकर तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिली.

सभेस श्रीगोंदा शाखाप्रमुख अभिमन्यू घोलवड, शेवगाव शाखाप्रमुख चंद्रकांत पडोळे, श्रीरामपूर शाखाप्रमुख शिवाजीराव तोरणे, संगमनेर शाखाप्रमुख ललित पवार, तसेच संचालक शहाराम चेमटे, नवनाथ धोंगडे, शांताराम आवारी, राधाकिसन आभाळे, यादव उदागे, दीपक वाळके, नामदेव बोरुडे, प्रियंका मिसाळ, विजया शिंदे, सीताराम गागरे, संजय गायके, गणेश बोबडे, राजू परदेशी, दत्तात्रय गडाख, तज्ज्ञ संचालक दत्तात्रय वाघुले, भाऊसाहेब शेळके व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Web Title: Annual meeting of Irrigation and Public Works Department Employees Co-operative Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.