पोस्टल डिव्हिजन सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:07+5:302021-03-31T04:21:07+5:30
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल गांधी यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. संस्थेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार लाभांश १० टक्के व कायम ...
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल गांधी यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. संस्थेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार लाभांश १० टक्के व कायम ठेवीवरील व्याज १३ टक्के दिवाळीपूर्वीच सभासदांच्या खात्यामध्ये वर्ग केले होते. या व्यवहारास सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना विशेष बक्षीस देण्यासाठी निधी उभारण्यात आला आहे. या निधीतून भेटवस्तू अथवा रोख वाटप यावर सभेत चर्चा झाली. त्यानुसार भेटवस्तू न देता बक्षीस रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून, त्याचबरोबर मिठाई बॉक्सकरिता २०० देखील वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रफुल्लकुमार काळे यांनी दिली.
संस्थेने सभासद कर्जावरील व्याजदरात कपात करून ९.५ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले असल्याची माहिती संचालक अमित कोरडे यांनी दिली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय जासूद, संचालक रंगनाथ दंडवते, उस्मान शेख, सलीम शेख, महेश तामटे, निसार शेख, संतू नरवडे, प्रताप कारखिले, व्यवस्थापक नितीन वाघ, उमेश सोनवणे, आदी उपस्थित होते.