जेष्ठांच्या सहवासात ज्ञानाचा अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:21 AM2021-09-11T04:21:53+5:302021-09-11T04:21:53+5:30
महेश जेष्ठ नागरिक संघ, संगमनेरच्या वतीने गुरुवारी (दि. ०९) जेष्ठ नागरिक व विविध संस्था पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा आयोजीत ...
महेश जेष्ठ नागरिक संघ, संगमनेरच्या वतीने गुरुवारी (दि. ०९) जेष्ठ नागरिक व विविध संस्था पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा आयोजीत केला होता. यावेळी अध्यक्षस्थानाहून डॉ. मालपाणी बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिसन भन्साळी यांच्या हस्ते व प्रदेश मंत्री मदनलाल मिनियार, प्रदेश सूचना व प्रसारण मंत्री ओमप्रकाश बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणेशलाल बाहेती, माहेश्वरी समाजाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अनिष मणियार, संगमनेर तालुकाध्यक्ष अतुल झंवर, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष सुरेश जाजू, सर्वश्री रामेश्वर लोया, सुभाष दरक, अशोक मणियार, बद्रिनारायण लोहे उपस्थित होते. यावेळी २१ ज्येष्ठ नागरिकांसह विविध संस्थांचे १५ पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. तर महेश सेवा निधीला ५० हजारांची देणगी दिल्याबद्दल विनयकिशोर मणियार व मनीष मणियार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संगमनेर तालुका सभेच्या वतीने अध्यक्ष अतुल झंवर व कोषाध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांनी प्रदेश पदाधिकारी यांचा सत्कार केला.
प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष गणेशलाल बाहेती यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन बाहेती व राहुल बाहेती यांनी केले. संघाचे माजी अध्यक्ष सुरेश जाजू यांनी आभार मानले. प्रदेश जनसंपर्क मंत्री मनीष मणियार, संयुक्त मंत्री विठ्ठलदास आसावा, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत पोफळे, श्रीकांत मणियार, सेवा निधीचे संयुक्त मंत्री बसंत मणियार, जिल्हा मानद मंत्री अजय जाजू, जिल्हा संयुक्त मंत्री सतीश बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्यामसुंदर बुब, विश्वनाथ कलंत्री, सुभाषचंद्र चांडक, जगदीश बाहेती, द्वारकानाथ बंग, विजय भुतडा, विजय पोफळे, अनिल अट्टल, केदारनाथ तापडे आदींनी परिश्रम घेतले.