संगमनेरात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; तालुक्यात नवे चार पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:47 PM2020-07-08T17:47:27+5:302020-07-08T17:48:34+5:30
कोरोनाची लागण झालेल्या शहरातील श्रमिकनगर येथील ५७ वर्षीय पुरूषाचा बुधवारी (८ जुलै) मृत्यू झाला. ग्रामीण भागातील निमगाव जाळी येथील एक तर शहरातील तीन अशा चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
संगमनेर : कोरोनाची लागण झालेल्या शहरातील श्रमिकनगर येथील ५७ वर्षीय पुरूषाचा बुधवारी (८ जुलै) मृत्यू झाला. ग्रामीण भागातील निमगाव जाळी येथील एक तर शहरातील तीन अशा चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. कोरोनाची लागण होवून संगमनेर तालुक्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
श्रमिकनगर येथील ५७ वर्षीय पुरूषाला शनिवारी (४ जुलै) कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. ग्रामीण भागातील निमगाव जाळी येथील २८ वर्षीय तरूण, शहरातील आॅरेंज कॉर्नर येथील ५९ वर्षीय पुरूष, ७३ वर्षीय महिला व गणेशनगर येथील ६५ वर्षीय पुरूष अशा चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या संगमनेर शहर व ग्रामीण भागातील ५७ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.