नगर तालुक्यात चारा छावणीचा दुसरा बळी! खांडके येथे शेतकर्‍याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 02:53 PM2019-08-22T14:53:41+5:302019-08-22T14:54:47+5:30

नगर तालुक्यातील खांडके येथील शेतकरी लक्ष्मण संपत गाडे (वय ३५) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

Another victim of fodder camp in Nagar taluka! Farmer's suicide at Khandke | नगर तालुक्यात चारा छावणीचा दुसरा बळी! खांडके येथे शेतकर्‍याची आत्महत्या 

नगर तालुक्यात चारा छावणीचा दुसरा बळी! खांडके येथे शेतकर्‍याची आत्महत्या 

केडगाव - नगर तालुक्यातील खांडके येथील शेतकरी लक्ष्मण संपत गाडे (वय ३५) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दुष्काळी परिस्थितीत शासनाने सुरू केलेल्या चारा छावण्या व ,पाण्याचे टँकर बंद केल्याने निराश होवून  लक्ष्मण गाडे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप खांडकेचे उपसरपंच पोपट चेटे यांनी केला आहे. याच कारणातून ४ ऑगस्ट रोजी घोसपुरी येथील शेतकर्‍यानेही आत्महत्या केली होती. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी नगर पाथर्डी महामार्गावर कौडगावध्ये रास्तारोको करण्यात आला. शेतकर्‍यांच्या आत्महत्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकसत मृत्यूची नोंद झाली आहे.
पावसाळा सुरू होवून दोन महिण्यानंतरही नगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. शेतात पीक नाही, जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही. अशा परिस्थितीत शासनाकडून सुरू असलेल्या चारा छावण्या व पाण्याचे टँकर बंद केल्याने जनावरे जगवायची कशी? या चिंतेने निराश झालेल्या खांडके येथील लक्ष्मण संपत गाडे या शेतकर्‍याने गळफास घेवून आत्हत्या केली. आत्महहत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. चारा छावण्या व पाण्याचे टँकर प्रशासनाने बंद केल्याने निराश होवून लक्ष्ण गाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप उपसरपंच चेटे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.
यत लक्ष्णण गाडे यांच्या पश्‍चात आई- वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
प्रशासनाच्या या धाकटशाही विरोधात ग्रामस्थांधून संताप व्यक्त होत असून मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार व सोमवारी जिल्ह्यात येत असून यावेळी मुख्यंमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


शेतकर्‍याला न्याय ळिवून देवू - संदेश कार्ले
गेल्या पंधरा दिवसापूर्वीही तालुक्यात अशीच घटना घडली होती. मात्र, त्या शेतकर्‍याला प्रशासनाकडून अद्यापही मदत मिळाली नाही. आता पुन्हा तालुक्यात अशी घटना घडल्याने शेतकर्‍यामधून संताप व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहुन न्याय मिळवून देवू, असे जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.

Web Title: Another victim of fodder camp in Nagar taluka! Farmer's suicide at Khandke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.