नगरमध्ये राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे आघाडीवर : जगताप, गडाख, लंके यांचीही नावे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 06:20 PM2019-03-13T18:20:22+5:302019-03-13T19:54:06+5:30
अहमदनगर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप, जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख,
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप, जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख, काँग्रेसचे दिवगंत नेते शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे, पारनेर तालुक्यातील युवा नेते निलेश लंके यांची नावे चर्चेत आहेत. मात्र शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून कळते.
भाजपकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण चर्चा सुरू झाली. पवार यांनी डॉ. विखे यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी आमदार अरुण जगताप यांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून नकार आल्याचे कळते. विखे यांच्या विरोधात स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून अनुराधा नागवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागवडेंच्या नावास होकार दिल्याचे समजते. आज सकाळीच नागवडे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. पवार यांनी उमेदवारी न दिल्यास नागवडे यांना आता उमेदवारी न दिल्यास विधानसभा निवडणुकीत तिकीटावर दावा करणार आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पवार कोणाला रिंगणात उतरवतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे चार-पाच दिवसांपासून चाचपणी केली. आज दुपारपर्यत आमदार अरुण जगताप यांच्या नावाची चर्चा होती. प्रशांत गडाख, युवा नेते निलेश लंके यांचीही नावे चर्चेत आली. थोड्याच वेळात राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.