ग्रामीण भागातून येणाऱ्यांमुळे वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:49+5:302021-03-31T04:21:49+5:30
नगर शहरात खासगी दवाखान्यांमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. खासगी वाहनांमधून असे रुग्ण येतात. मात्र, खासगी रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे नियम ...
नगर शहरात खासगी दवाखान्यांमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. खासगी वाहनांमधून असे रुग्ण येतात. मात्र, खासगी रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येते. दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी आहे. तेथेही कोरोनावर उपचार करणारे कर्मचारी आणि इतर आजारांवर उपचार करणारे कर्मचारी एकच असल्याचे दिसून येत आहे. येथूनच हा संसर्ग पसरत आहे.
एस. टी.मध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन होत नाही. प्रवासी सॉनिटायझर जवळ बाळगून असतात. तसेच मास्कही लावतात. मात्र, गर्दीमुळे अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे एकमेकांशी संपर्क येण्याचे प्रमाण एस. टी.मध्ये आणि बसस्थानकांमध्ये दिसून येते. हीच परिस्थिती रेल्वे स्थानकावरही पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातून येणारे नागरिक शहरात विविध कामांसाठी वेगवेगळ्या भागात फिरत असतात. यावेळी ते मास्क वापरत असले तरी सॉनिटायझर त्यांच्याकडे नसल्याचे दिसून येत आहे.
---
एकूण कोरोना रूग्ण -९३२४२
बरे झालेले रूग्ण -८५६५२
सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेले रूग्ण -६३८५
गृहविलगीकरणातील रूग्ण -४५००
एकूण बळी -१२०५
--------------
एस. टी. बस- ६००
ट्रॅव्हल्स- ५००
रेल्वे- १००
बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही
बाहेरगावातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणीच केली जात नाही. बसस्थानक, रेल्वेस्थानक, नाका आदी ठिकाणांहून नगर शहरात रुग्ण येत आहेत. मात्र, त्यांची चाचणी करण्याची कोणतीही सोय नाही. नगर शहरात येणाऱ्यांची गतवर्षीप्रमाणे तपासणीही केली जात नाही. त्यामुळे संसर्गात वाढ होत असल्याचे दिसते.