‘वृद्धेश्वर’च्या अध्यक्षपदी आप्पासाहेब राजळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:18+5:302021-02-13T04:20:18+5:30
प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी ११ वाजता आदिनाथनगर येथे ...
प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी ११ वाजता आदिनाथनगर येथे डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात झाली. अध्यक्षपदासाठी राजळे यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांनी मांडली. बाबासाहेब किलबिले यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी काकडे यांच्या नावाची सूचना सुभाषराव बुधवंत यांनी मांडली. सुभाषराव ताठे यांनी अनुमोदन दिले. राज्य साखर कामगार संघ, कारखान्याचा प्रशासन विभागाच्या वतीने राजळे, काकडे यांचा सत्कार करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी सहा वेळा कारखाना निवडणूक बिनविरोध करून संचालक मंडळाच्या कामकाजाप्रती सार्वत्रिक विश्वास व्यक्त केला. विकासासह नकळत केलेल्या स्नेहभावाचा हा ओलावा आहे. वृद्धेश्वर उद्योग समूह एक विशाल कुटुंब आहे. सभासद केंद्रबिंदू माणून त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधा देऊ. नियोजित इथेनॉल उपपदार्थ निर्मिती प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी दिली.
याप्रसंगी कारखान्याच्या नूतन संचालिका आमदार मोनिका राजळे, सिंधुताई जायभाय, संचालक राहुल राजळे, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गोल्हार, शरद अकोलकर, कुशीनाथ बर्डे, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, सहाय्यक निवडणूक अधिकारी रमेश ससाणे, कार्यकारी संचालक जालिंदर पवार प्रसंगी उपस्थित होते. सरव्यवस्थापक भास्करराव गोरे यांनी आभार मानले.
..
फोटो-१२आप्पासाहेब राजळे
१२रामकिसन काकडे