शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:34+5:302020-12-08T04:18:34+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब, हरियाणा राज्यांतील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप निर्माण झालेले आहे. परंतु, शेतकऱ्यांचे हे आंदोलन ...
गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब, हरियाणा राज्यांतील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप निर्माण झालेले आहे. परंतु, शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचे षडयंत्र भाजपा सरकार करीत आहे. देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा जाचक कायदा रद्द करावा, ही मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य करावी व शेतकरीविरोधी कायदा रद्द करावा याकरिता भारत बंदची हाक दिली आहे, अशी माहिती डाॅ. प्रकाश पवार, दत्ता कवाने, रवींद्र आढाव, नंदू तनपुरे, मच्छिंद्र गुंड, राहुल शेटे, राजेंद्र खोजे, संजय संसारे, कांतीलाल जगधने, सचिन ठुबे, कांता तनपुरे, संदीप आढाव, संतोष आघाव, दिनेश वराळे, सुनील इंगळे, अनिल भट्टड, शंकर धोंडे, दिलीप चौधरी, सुनील तनपुरे, पांडू उदावंत, संदीप कवाने, अभिजित नरोडे, बिलाल शेख, किशोर येवले आदींनी दिली.