‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:49+5:302021-09-27T04:21:49+5:30
संगमनेर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ सप्टेंबरला दहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र, तरीही संवेदनशीलता नसलेले मोदी-शहा ...
संगमनेर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ सप्टेंबरला दहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र, तरीही संवेदनशीलता नसलेले मोदी-शहा सरकार ढिम्म बसलेले आहे. या सरकारचा देशभरात निषेध व्हावा, तसेच त्यांच्या हडेलहप्पी धोरणाविरोधात जनरेटा वाढविण्यासाठी मंगळवारी (दि. २७) भारत बंदचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे, असे समाजवादी जनपरिषदेच्या नेत्या ॲड. निशा शिवूरकर यांनी सांगितले.
संगमनेर प्रांतकचेरीसमोर दुपारी एक वाजता सभा होणार असून, त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन किसान संघर्ष समितीचे संयोजक प्रा. शिवाजी गायकवाड, अनिल गुंजाळ, शांताराम गोसावी, ज्ञानदेव सहाणे, दशरथ हासे, ज्ञानेश्वर राक्षे, सुनंदा रहाणे, अनिल कढणे, अनिल शिंदे, बाबूराव गायकवाड यांनी केले आहे.