जरे खून खटल्यात निकम यांची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:40+5:302021-01-13T04:50:40+5:30
याबाबत जरे व त्यांचे वकील ॲड. सचिन पटेकर यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून, या निवेदनाच्या ...
याबाबत जरे व त्यांचे वकील ॲड. सचिन पटेकर यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री व पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, रेखा जरे हत्याकांडातील इतर आरोपींना अटक झालेली आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे अद्याप फरार आहे. त्याचा ठावठिकाणा पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी रेंगाळल्याने संशयाला वाव आहे. हे प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. हत्येच्या घटनेला महिना उलटून गेला तरी बोठे याला अटक झालेली नाही. बोठे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याचे गुन्हे आता लोकांसमाेर येत आहेत.
अशा परिस्थितीत या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी होणे गरजेचे आहे. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम अथवा ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नेमणूक होणे गरजेचे आहे. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून न्यायनिवाडा व्हावा, अशी मागणी या निवेदनात रुणाल जरे व ॲड. सचिन पटेकर यांनी केली आहे.