उत्तर प्रदेशच्या चार अग्नीवीरांचे नियुक्ती पत्र निघाले बनावट; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
By अण्णा नवथर | Published: May 25, 2023 04:54 PM2023-05-25T16:54:09+5:302023-05-25T16:54:16+5:30
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर: उत्तरप्रदेशातून अग्निवीरमध्ये भरती झाल्याचे सांगून अहमदनगर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या चार जणांच नियुक्तीपत्र बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्श नांगेलाल कुंशवाह ( १९, रा. रात्योरा, ता. कोरॉन, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश), मोहितकुमार माणिकलाल यादव ( २५, रा. कासीमाबाद, सारंगपूर, ता. कररचना, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश), आनंद श्यामनारायण शर्मा ( २३, रा. साडवा, ता. करचना, जि. प्रयोगराज, उत्तरप्रदेश ) असे बनावट नियुक्ती पत्र असलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुभेदार शिवाजी रामदास काळे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत संबंधित तरुणांकडे विचारपूस केली असता हे नियुक्ती पत्र त्यांना लाेकेशकुमार तेजपालसिंग राजपूत ( रा. मिरजापूर ता. गौतमबुध्दनगर, उत्तरप्रदेश ), गोपाल रामसिंग चौधरी ( शिखरना, ता. हातरोली, जि. अलगीड उत्तरप्रदेश) या दोघांनी दिले असून, ते सध्या अहमदनगरमध्ये वास्तव्यास आहेत, अशी माहिती दिली. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.