संतोष खेडलेकर यांची साहित्य संस्कृती मंडळावर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:20+5:302021-05-28T04:17:20+5:30

लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. राज्यभरातून मराठी साहित्य व भाषा विषयाच्या ३० ...

Appointment of Santosh Khedlekar on Sahitya Sanskriti Mandal | संतोष खेडलेकर यांची साहित्य संस्कृती मंडळावर नियुक्ती

संतोष खेडलेकर यांची साहित्य संस्कृती मंडळावर नियुक्ती

लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. राज्यभरातून मराठी साहित्य व भाषा विषयाच्या ३० अभ्यासकांची ही समिती पुढील तीन वर्षे महाराष्ट्र् राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे कामकाज बघणार आहे. डॉ. खेडलेकर यांची आजवर ११ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मराठी भाषा, तमाशा व इतिहास विषयाचे अभ्यासक असलेले डॉ. खेडलेकर यांनी यापूर्वी प्रवरा खोरे गॅझेटियर, महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशासाठी लेखन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीवरही त्यांनी यापूर्वी काम केलेले आहे. नवीन मंडळात अरुण शेवते, प्रज्ञा पवार, प्रा. रंगनाथ पठारे, नागनाथ कोत्तापल्ले, उत्तम कांबळे. फ. मुं. शिंदे, विनोद शिरसाट, डॉ.आनंद पाटील, शामराव पाटील आदींसह ३० साहित्यिकांचा समावेश आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Appointment of Santosh Khedlekar on Sahitya Sanskriti Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.