शाळांना भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:21 AM2021-01-25T04:21:03+5:302021-01-25T04:21:03+5:30
प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना तसे कळविले आहे. जिल्ह्यातील पाचवी ते आठवी शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ...
प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना तसे कळविले आहे. जिल्ह्यातील पाचवी ते आठवी शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तालुक्यांना यापूर्वीच दिलेल्या आहेत. त्यानुसार शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून याची अंमलबजावणी झाली का, हे पाहण्यासाठी भेटी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ जानेवारी रोजी हे अधिकारी संबंधित तालुक्यातील शाळांना भेटी देऊन भेटीचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भेटी अधिकाऱ्यांमध्ये उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण (महानगरपालिका), विलास साठे (अहमदनगर), विस्तार अधिकारी विनेश लाळगे (श्रीरामपूर), राजेंद्र पवार (पारनेर), जयश्री कार्ले (अहमदनगर), मनीषा कुलट (राहुरी), शोभा निंबाळकर (कोपरगाव), अलीम शेख (पाथर्डी), मंगला लकारे (संगमनेर), लक्ष्मीकांत देशमुख (जामखेड), बाबासाहेब जाधव (शेवगाव), जिल्हा समन्वयक विश्वास भाटे (कर्जत), प्रसाद पोळ (श्रीगोंदा), श्रद्धा मोरे (नेवासा), जबीन शेख (राहाता), संतोष साठे (अकोले) यांचा समावेश असून त्यांनी त्यांच्या तालुक्यांना भेटी द्यायच्या आहेत.
--------
भेट नमुना अहवालातील बाबी
भेट देणाऱ्या अधिकाऱ्याने भेट कधी दिली, भेटीच्या शाळेचे नाव, तेथील पट, पालकांकडून प्राप्त संमतीपत्रांची संख्या, भेटीच्या दिवशी उपस्थित विद्यार्थीसंख्या, ५ ते ८ एकूण शिक्षक, शिक्षकेतर संख्या, कोरोना चाचणी झालेले शिक्षक, उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर संख्या, वर्ग, परिसर स्वच्छता अभिप्राय, शाळा निर्जंतुकीकरण, थर्मामीटर, थर्मल उपलब्धतेबाबत, दिलेल्या सूचनांचे पालन होते किंवा नाही, अशी माहिती अहवालात सादर करून हा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावा, अशा सूचना आहेत.