फिरोदिया प्रशालेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:14+5:302020-12-08T04:18:14+5:30

शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवून विविध डिजिटल ...

Appreciation from the Guardian Minister of Firodia School | फिरोदिया प्रशालेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

फिरोदिया प्रशालेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवून विविध डिजिटल माध्यमातून ९६२ स्वनिर्मित व्हिडिओज यू-ट्यूब चॅनलमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. याबाबतची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना संस्थेच्या सचिव र. धों. कासवा, मुख्याध्यापिका योगिता गांधी, विनोद कटारिया यांनी दिली असता त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

कासवा म्हणाले, या कोरोनाचा काळात प्रशालेत मोफत कोविड अ‍ँटिजन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले होते. मुख्यमंत्री सहायता निधीस ४५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. गरजू पालकांना शिधा वाटप केले तसेच विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास घेतला. मुख्याध्यापिका गांधी म्हणाल्या, कोरोना काळातही आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून पूर्व प्राथमिक वर्ग ते सातवीपर्यंत प्रथम सत्राचे अभ्यासक्रमावर आधारित तब्बल ९६२ स्वनिर्मित व्हिडिओज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविलेले आहेत.

-------

फोटो मेल - सविता फिरोदिया

सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील कोरोना काळात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती पुस्तिका संस्थेचे सचिव र. धों. कासवा, मुख्याध्यापिका योगिता गांधी व विनोद कटारिया यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिली.

Web Title: Appreciation from the Guardian Minister of Firodia School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.