खर्डा, मिरजगाव येथे वखार उभारणीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:26+5:302021-05-25T04:24:26+5:30

जामखेड/कर्जत : कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड येथील खर्डा येथे राज्य वखार महामंडळाने प्रत्येकी ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या ...

Approval for setting up of warehouse at Kharda, Mirajgaon | खर्डा, मिरजगाव येथे वखार उभारणीस मंजुरी

खर्डा, मिरजगाव येथे वखार उभारणीस मंजुरी

जामखेड/कर्जत : कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड येथील खर्डा येथे राज्य वखार महामंडळाने प्रत्येकी ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या वखार उभारणीस मंजुरी दिली आहे. त्यासाठी ५ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.

वखार उभारणीच्या कामाला मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसांत वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे. यामुळे कर्जत-जामखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याच्या जागेची चिंता कायमची मिटणार आहे.

कर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले, तरी या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसे. सरकारी हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर मका, तूर यासारखे इतर धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शेतमाल खरेदी पूर्णपणे करता येणे शक्य नव्हते. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेत आमदार रोहित पवार यांनी तातडीने यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला व अखेर या पाठपुराव्याला यश आले.

---

कर्जत व जामखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सरकारी हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर अपुऱ्या जागेमुळे पूर्ण क्षमतेने शेतमाल खरेदी करणेदेखील चिंताजनक ठरत होते. दरम्यान, यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर कर्जतमधील मिरजगाव व जामखेडमधील खर्डा येथे वखार महामंडळाकडून वखार उभारण्यात येत आहे.

-राेहित पवार,

सदस्य, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ

Web Title: Approval for setting up of warehouse at Kharda, Mirajgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.