वृक्षसंवर्धन ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:42+5:302021-03-25T04:20:42+5:30

अहमदनगर : नगर तालुक्यातील देवगाव येथे ‘नाबार्ड’ने वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबवला आहे. गावामध्ये नवजीवन ...

Arboriculture is the need of the hour | वृक्षसंवर्धन ही काळाची गरज

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज

अहमदनगर : नगर तालुक्यातील देवगाव येथे ‘नाबार्ड’ने वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबवला आहे. गावामध्ये नवजीवन प्रतिष्ठान व सामाजिक वनीकरण विभाग, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन व हवामान दिन साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल डी. आर. जिरे म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे वनक्षेत्र घटत आहे. सिमेंटची जंगले वाढत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे. यामुळे वातावरणही बदलत चालले आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, त्याचा विपरीत परिणाम ऋतूमानावर होत आहे. त्यामुळे जल, जंगल, जमीन, जनावर आणि जीवन यांची यात विलक्षण हानी होत आहे. हे रोखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे.

यावेळी ‘नवजीवन’चे राजेंद्र पवार, वनपाल ए. डी. बोरुडे, सरपंच संभाजी वामन, ‘जय किसान’चे संजयमास्तर वामन, सोमनाथ वामन, महेंद्र वामन, निखील शिंदे, मिठूभाऊ वामन, अजिनाथ बळे, जयेश गायकवाड आदी उपस्थित होते.

....................

फोटो -२४ जिरे

– डावीकडून महेंद्र वामन, सरपंच संभाजी वामन, सामाजिक वनीकरणचे ए.डी.बोरुडे, डी.आर.जिरे, नवजीवनचे राजेंद्र पवार, संजय मास्तर वामन

Web Title: Arboriculture is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.