स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदी अर्चना धुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:27+5:302021-04-12T04:19:27+5:30

----------------- व्यापाऱ्यांतर्फे जगताप यांना निवेदन अहमदनगर : कोरोना लॉकडाऊमुळे छोटे व्यावसायिक, व्यापारी वर्गाचे हाल सुरू आहेत. लॉकडाऊन झाले तरी ...

Archana Dhule as Swabhimani's state president | स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदी अर्चना धुळे

स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदी अर्चना धुळे

-----------------

व्यापाऱ्यांतर्फे जगताप यांना निवेदन

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊमुळे छोटे व्यावसायिक, व्यापारी वर्गाचे हाल सुरू आहेत. लॉकडाऊन झाले तरी त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. सर्व व्यापारी नियमांचे पालन करतील, अशी मागणी व्यापाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजय पितळे, सतीश कुलकर्णी, सतीश जामगावकर, सतीश कुलकर्णी, संतोष ठाकूर, हरिदास लखारा, गिरीष सुगंधी, विनय गुंदेचा, विष्णू बल्लाळ, लितेश आहुजा, दीपक कासवा, प्रकाश सराफ, संजय सोंडकर, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सतीश कुलकर्णी म्हणाले, शासनाने लवकरात लवकर व्यापाऱ्यांचा विचार करून आठवड्याचे ३-४ दिवस तरी दुकान चालू ठेवण्यास अनुमती द्यावी. अशी परवानगी न मिळाल्यास व्यापाऱ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

------

डॅशबोर्डवरील बेड स्थिती

बेड प्रकार एकूण बेड शिल्लक बेड

नार्मल बेड ११३७१ ५६२०

ऑक्सिजन बेड २४२९ ३७८

आयसीयू बेड १०१६ १०८

नगरमधील डीसीएचसी ० ०

---------------------

बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के

जिल्ह्यात कोरोनाने बाधित होत असलेल्यांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रोज सरासरी दोन हजार जण बाधित होत आहेत, तर रोज सरासरी १२०० ते १५०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात येत आहे. रविवारी १६१७ जणांना बरे वाटत असल्याने घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८७.८२ टक्के इतके आहे. बरे होणाऱ्यांचा कालावधी दहा दिवसांपेक्षा कमी असल्याने हे चित्र दिलासादायक आहे.

Web Title: Archana Dhule as Swabhimani's state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.