सेना नगरसेवक दुलम भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:22 AM2018-08-08T11:22:14+5:302018-08-08T11:23:00+5:30

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे समर्थक व नगरसेवक मनोज दुलम यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

Army corporator Dulam Bapat | सेना नगरसेवक दुलम भाजपात

सेना नगरसेवक दुलम भाजपात

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे समर्थक व नगरसेवक मनोज दुलम यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पद्मशाली समाज दुखावला होता. या समाजाला प्रतिनिधीत्त्व देण्यासाठी भाजपने दुलम यांना पक्षात घेवून शिवसेनेविरुद्ध डाव टाकला आहे.
दुलम हे राठोड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या सहा महिन्यांपासूनच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यात छिंदम प्रकरणामुळे पद्मशाली समाज भाजपपासून दूर जाण्याची भिती होती. त्यामुळे खा. गांधी यांनी दुलम यांना पक्षात घेवून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. दिल्ली येथे झालेल्या या प्रवेशाच्यावेळी खा.दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, अभिजित चिप्पा, सागर गोरे, हेमंत दंडवते उपस्थित होते.
यावेळी खा.दानवे म्हणाले, नगर शहराच्या विकासासाठी स्वत: लक्ष घालणार आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या रूपाने चांगला शहराध्यक्ष लाभला आहे. पुणे, नाशिकच्या धर्तीवर नगरसाठी भरघोस विकास निधी भाजपाचे सरकार देणार आहे.
खा. गांधी म्हणाले, दुलम यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाची सावेडी उपनगरातील ताकद वाढणार आहे. दुलम म्हणाले, राज्यात ओबिसींसाठी भाजपाचे सरकार चांगले निर्णय घेत आहे. नगरपालिकेत सतत पाठपुरावा करूनही प्रभागाचा विकास होत नव्हता. त्यामुळे प्रभागाच्या विकासासठी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप देशात, राज्यात प्रगतीपथावर आहे. आता नगरमध्येही भाजपाची सत्ता यावी यासाठी योगदान म्हणून पक्षात प्रवेश केला आहे.

Web Title: Army corporator Dulam Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.