केडगाव हत्याकांडप्रकरणी विधानपरिषदेत सेना- राष्ट्रवादी आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:18 IST2018-07-19T14:18:42+5:302018-07-19T14:18:58+5:30
केडगाव येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडप्रकरणी विधानपरिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर शिवसेना दबाव टाकत असल्याचा आरोप केला.

केडगाव हत्याकांडप्रकरणी विधानपरिषदेत सेना- राष्ट्रवादी आमने-सामने
अहमदनगर : केडगाव येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडप्रकरणी विधानपरिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर शिवसेना दबाव टाकत असल्याचा आरोप केला.
केडगावच्या दुहेरी खून प्रकरणी पोलिसांवर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा दबाव असल्याचे त्यांनी धनंजय मुंडे सांगितले. नगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी महासंचालकांना लिहिलेले पत्र सभागृहात वाचून दाखवले. तर दोन दिवसांपुर्वी या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी आमने - सामने आली आहेत.
वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे.